• +91 9421019313
  • A-20, Vijayshree Towers, Dattwadi, Pune 411030
  • jividha.rajiv@gmail.com

नमस्कार. कोरोना महामारीमुळे जगभर थैमान घातले आहे. भारतासाख्या अनेक देशांतून अमलात आणलेल्या लॉकडाऊन मुळे व्यवहर ठप्प आहेत. व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसानच होते आहे. कायमस्वरूपी नोकरी असणाऱ्यांना पगार हा थोडा तरी दिलासा आहे. पण रोजंदारीवर काम करणाऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. शहरातील मजुर, हमाल, रिक्षाचालक, कारागीर वगैरे लोकांना दिवसाच्या खाण्याची भ्रांत आहे. याबाबत मिडीयातुन लिखाण होते आहे. यात एक वर्ग आहे ज्यांनाही रोजच्या मिळकतीची चिंता निर्माण झाली आहे. मात्र हा वर्ग थोडासा दुर्लक्षित होत आहे. देशाच्या विविध व्याघ्र प्रकल्पात गाईड म्हणून काम करणाऱ्या अनेक गाईड्सचा हा वर्ग सध्या ओढवलेल्या परिस्थिमुळे त्रस्त झाला आहे. वन्यजीव संवर्धनाच्या कामात स्थानिकांचा सहभाग असल्या शिवाय योजना यशस्वी होणार नाही हे जाणून वनखात्याने प्रत्येक जंगलात स्थानिक लोकांनाच गाईड म्हणून काम करता येईल हे धोरण स्वीकारले. त्यामुळे फॉरेस्ट गाईड हे आदिवासी किंवा वनक्षेत्राच्या परिघातील लोक आहेत. परंतु फॉरेस्ट गाईडच्या या कामाला नोकरीचे स्वरूप नाही तर त्यांना प्रत्येक सफारीचे मानधन मिळते व टुरीस्ट कडून काही वेळा मिळणारी टिप हे जास्तीचे उत्पन्न असते.


वर्षातील पावसाळ्याचे कमीत कमी तीन महिने जंगल बंद असते. मार्च - एप्रिल महिन्यात परीक्षांमुळे पर्यटक नगण्य असतात. वर्षातील ५ महिने टुरीस्ट मोठ्या संख्येने येतात. सध्याच्या परिस्थितीमुळे जंगल सफारी बंद असल्याने ऐन उन्हाळ्याच्या सिझनमधे या लोकांचा रोजगार पुर्ण बंद झाला आहे. अनुज खरे (नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे), राजीव पंडित (जीविधा ट्रस्ट, पुणे) व ओंकार बापट (वाईल्डलाईफ अनलिमिटेड, चिपळूण) महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील फॉरेस्ट गाईड व गार्डना प्रशिक्षण देण्याच्या निमित्ताने या लोकांच्या सतत संपर्कात असतात. या संकटात वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे काम करणाऱ्या गाईड बंधूंना मदत करावी अशी संकल्पना आमच्या मनात आली.

यासाठी आम्ही महाराष्ट्रातील नागझिरा आणि मध्यप्रदेशातील पन्ना असे दोन व्याघ्र प्रकल्प निवडले आहेत. नागझिरा येथील गाईड गोंड आदिवासी आहेत व पन्ना मधील गाईड मध्य प्रदेशात सुधारणांपासून दुर असलेल्या दुर्गम खेडेगावातील आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची जास्त गरज आहे असे आम्हाला वाटते. नागझिरा येथे 49 व पन्ना येथे 65 नोंदणीकृत गाईड आहेत. शासन सर्वांना पुरे पडू शकणार नाही. आपण निसर्गाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. या कामात आपल्या सारख्या निसर्गप्रेमींच्या मदतीची गरज आहे. कमीत कमी रू. 100/- पासून कितीही रकमेची मदत आपण करू शकता. आपली मदत त्या गाईडना फार मोलाची आहे. रक्कम ऑनलाईन स्वरुपात जीविधा किंवा नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टच्या बॅंक खात्यात जमा करावी. कृपया पैसे जमा केले की informanuj@gmail.com किंवा jividha.rajiv@gmail.com किंवा om.cobra@gmail.com या ईमेलवर आम्हाला आपले नाव, पत्ता व भरलेली रक्कम याचे डिटेल्स कळवावे. पावती बनवणे आणि मदतीच्या पैशांचा हिशोब ठेवणे यासाठी हे आवश्यक आहे.



पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी बॅंक डिटेल्स
1. Jividha
Bank of Baroda, L.B.S. Road Branch, Pune 411030
Saving Account no - 15320100005506
NEFT /IFSC Code is BARB0LALBAH (Fifth Character is numerical Zero)

पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी बॅंक डिटेल्स
2. Nature Walk Charitable Trust
Bank of India, Branch :- Karve Road
Account No : 050310100026577
IFSC Code :- BKID0000503



कृपया 15 एप्रिल पर्यंत आपण मदतीची रक्कम वरील खात्यात पाठवावी. जमा झालेली एकत्रित रक्कम आम्ही नागझिरा व पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या गाईडच्या खात्यात पाठवू. Please send us the details on email ( informanuj@gmail.com , jividha.rajiv@gmail.com , om.cobra@gmail.com ) with the below mentioned details so that we can make a note of it at our end.

Amount Donated:
Bank Details:


आपले विश्वासू,
राजीव पंडित, जीविधा (9421019313)
अनुज खरे, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट (9326823052)
ओंकार बापट, वाईल्डलाईफ अनलिमिटेड (7721854466)